Pune Porsche Accident | पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लागलं आहे. अशात अग्रवालांच्या निकटवर्तीयांनी पत्रकारांशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. इतकं होऊनही मस्तवालपणा जाईना, अशा प्रतिक्रीया समोर येऊ लागल्या आहेत.
अग्रवालांच्या निकटवर्तीयांची अरेरावी
या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेत असताना अगरवाल कुटुंबातल्या एकाने पत्रकारांशी अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आल.
आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि चालकाची समोरासमर बसून चौकशी केली. यावेळी सुरेंद्रकुमार याच्याबरोबर असलेल्या एकाने स्वत:ला वकील असल्याचे सांगत पत्रकारांशी अरेरावी केली.
Pune Porsche Accident | “उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल”
सुरेंद्र अग्रवाल असलेल्या या व्यक्तीने पत्रकार बाजूला असल्याचे लक्षात येताच ‘हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल, त्यांच्या नादी का लागत आहेत?, असं म्हटलं होतं.
सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस नेत असताना पत्रकार वारंवार छोटा राजनशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर काहीही न बोलता अगरवाल वारंवार आपला नातू अल्पवयीन असल्याचं बोलत होते. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने अरेरावी केल्याचं समोर आलंय.
दरम्यान, अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; नव्या दाव्याने खळबळ
दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल
तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत
महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी
सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार