पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, मृताच्या आईचा संताप

Pune Porsche Accident | पुणे पोर्शे अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणाबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने पुणे पोर्शे अपघाता (Pune Porsche Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील हे जेलमध्ये आहेत. त्यामुळे आता आरोपीला त्याच्या आत्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. आरोपीला जामीन मंजूर झाल्याने मृत्यू झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आईने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

“त्याला कठोर शिक्षा तर मिळालीच पाहिजे”

तरण्याताठ्या मुलाच्या मृत्यूने त्याची आई खचून गेली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने आम्ही खूप निराश झालो असल्याचं ते म्हणाले आहेत. अल्पवयीन आरोपीला फाशी व्हावी अशी आमची इच्छा नाही. पण त्याला कठोर शिक्षा तर मिळालीच पाहिजे, की तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, असं त्या म्हणाल्या.

अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरूंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा त्यांच्या आत्याकडे देण्यात यावा, असं कोर्टाने म्हटलं. मुंबई हायकोर्टाच्या आदेशामुळे 33 दिवसानंतर त्याची बालसुधागृहातून सुटका होणार आहे.

काय आहे अपघात प्रकरण?

पुणे येथील कल्याणीनगर भयानक अपघात झाला होता. पोर्शे कारने (Pune Porsche Accident) दोघांना रस्त्यावर जागीच चिरडलं. या प्रकरणाला महिना उलटून गेला. यावेळी घटनास्थळी उपस्थितांनी अपघात करणाऱ्या आरोपीला बेदम मारहाण केली. याप्रकरणात आमदार सुनिल टिंगरेंचं नाव आलं होतं. हे प्रकरण दाबून टाकण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवणारा चालक हा अल्पवयीन होता.

याप्रकरणी त्याचे वडील , आजोबा, रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न करणारी त्याची आई, तसेच ससूनमधील एक डॉक्टर आणि एक कर्माचारी यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलाला नुकताच जामीन देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Pune Porsche Accident Case Minor Boy Got Bail

महत्त्वाच्या बातम्या

“राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या”; ‘या’ नेत्याने केली मागणी

आनंदाची बातमी! वनप्लस कंपनीने लाँच केला भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन

पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!

पुण्यात ‘झिका’चे रुग्ण आढळल्याने खळबळ, काय आहेत या आजाराची लक्षणं?

पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ