“अपघाताच्या रात्री दारु..”; अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली

Pune Porsche Accident | पुणे कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशात घटनेतील अल्पवयीन आरोपी मुलाने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपासात मोठा खुलासा झाल्याची माहिती समोर येत आहे.

19 मेच्या रात्री कार अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्या रात्री आपण मद्यधुंत अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही संबंधित मुलाने चौकशी दरम्यान सांगितल्याचं कळतंय.

या पप्रकरणी आरोपी मुलाच्या आईला देखील अटक करण्यात आली होती. बाल न्याय हक्क मंडळाने 31 मे रोजी पोलिसांना अल्पवयीन आरोपी मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, त्याच्या आईच्या उपस्थितीमध्ये मुलाची चौकशी करण्यात आली.

आरोपी मित्रांचीही कबुली

अपघात घडला त्या रात्री कारमध्ये अल्पवयीन मुलासोबत अजून दोन जण बसलेले होते. या दोघांनी अल्पवयीन आरोपी मध्यप्राशन करुन भरधाव कार चालवत होता, अशी माहिती पोलिसांना दिली असल्याचं कळंतय.

आता अल्पवयीन मुलाच्या या दोन मित्रांना (Pune Porsche Accident) पोलिस साक्षीदार करणार असल्याचं म्हटलं जातंय. पाहायला गेलं तर, अद्याप पुणे पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या अपघात प्रकरणात सध्या संपूर्ण अग्रवाल कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.

अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक

आरोपी अल्पवयीन मुलगा त्याचे आई-वडील आणि आजोबा सध्या अटकेमध्ये आहेत.आरोपी अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात असून त्याला 5 जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा (Pune Porsche Accident) आदेश देण्यात आलाय. या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, शिवानी अग्रवाल यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

News Title – Pune Porsche Accident Minor Accused Boy Confession

महत्त्वाच्या बातम्या- 

…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?

प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ

आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल