Pune Porsche Car Accident | पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला (Pune Porsche Car Accident) धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे ही पोर्शे महागडी आलिशान कार सतरा वर्षांचा मुलगा चालवत होता. हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेल्या विशाल अग्रवालचा (Vishal Agraval) मुलगा होता.
सामान्य जनतेमध्ये या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. तसेच पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारवाईवरही अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पोलिसांनी (Pune Police) चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगलं तापलं.
पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा
आता या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी मोठा खुलासा केलाय. वेदांत अग्रवाल याचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसला तरी आमच्याकडे त्याच्याविरोधात भक्कम असे तांत्रिक पुरावे आहेत, असा दावा अमितेश कुमार यांनी केला.
आम्ही वेदांत अग्रवाल याला न्यायालयात सादर केले तेव्हाही त्याने मद्यप्राशन केल्याचे सांगितले. तसेच तो अरुंद रस्त्यावर, विना नंबरप्लेटची गाडी भरधाव वेगाने चालवत होता, या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. पण न्यायालयाने वेदांत अग्रवाल याला जामीन दिला, असंही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.
“आमच्या अधिकारात ती गोष्ट येत नाही”
एका अर्जात नृशंस कृत्य असल्यान आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवावा, अशी मागणी होती. तर दुसऱ्या अर्जात निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपींना 14 दिवसांसाठी रिमांड होममध्ये पाठवा, अशी मागणी होती. मात्र, कोर्टाने या दोन्ही मागण्या फेटाळल्या आणि त्यांना जामीन दिला. जामीन देणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, आमच्या अधिकारात ती गोष्ट येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे . ज्य दोन निष्पाप जीवांचा बळी गेलाय त्यांना न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर कधी नव्हताच, असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट तर ‘या’ भागाला अवकाळी झोडपणार
“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट
“…तर मी BJP सोडेल”, अभिनेता शेखर सुमनचं मोठं वक्तव्य