Pune Porsche Car Accident | पुणे अपघाताप्रकरणी (Pune Porsche Car Accident) दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. अल्पवयीन आरोपीने दोघांना पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे गाडीने उडवलं. त्याच मध्यरात्री अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल एक दोन नाहीतर 45 मिस्डकॉल केल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Porsche Car Accident)
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल 45 मिस्डकॉल केल्याची माहिती समोर आली. पोलीस चौकशी करत असताना याबाबतची माहिती समोर आली आहे, अशी माहिती एका वृत्ताद्वारे देण्यात आली आहे. (Pune Porsche Car Accident)
46 वा फोन उचलला
पुणे पोलीस आणि गुन्हेशाखेनं सध्या या प्रकरणात संयुक्तपणे तपास सुरू केला. यामध्ये कल्याणीनगर अपघाताशी संबंधित फोन कॉल्स तपासण्यात आले होते. त्यावेळी अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवाल यांनी 45 फोन केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अखेर शेवटी म्हणजेच 46 व्या वेळी सुनील टिंगरे यांनी विशाल अग्रवाल यांचा फोन उचलला, अशी माहिती समोर आली आहे. (Pune Porsche Car Accident)
3.45 वाजता सुनिल टिंगरे हे विशाल यांच्याशी बोलणं झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते सकाळी सहा वाजता पोलीस ठाण्यातून माघारी आले होते. येरवडा पोलीस ठाण्यात सुनील टिंगरे स्पष्टपणे दिसत आहेत.
टिंगरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले
पोलीस तपासादरम्यान अग्रवाल कुटुंबीय, आमदार सुनील टिंगरे आणि येरवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे संभाषण तपासण्यात आले आहे. सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप करण्यात आला. मात्र टिंगरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Pune Porsche Car Accident)
आपण केवळ विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून आणि आपल्या विभागात अपघात झाल्यामुळे पोलीस स्टेशनला आल्याचं टिंगरेंनी सांगितलं. अपघाताचे गांभीर्य पाहूण मी आरोपींना कडक कारवाई करा असं सांगून माघारी परतलो होतो, असं टिंगरे यांनी सांगितलं आहे.
News Title – Pune Porsche Car Accident Big news Update About MLA Sunil Tingre
महत्त्वाच्या बातम्या
इम्तियाज जलिल यांनी घेतली जितेंद्र आव्हाडांची बाजू, म्हणाले…
पुण्यात पब आणि बारचालकांना दणका; कठोर नियम लागू होणार?
‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडियाचे शिलेदार कोण असणार?
गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं; जाणून घ्या आजचे दर
घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट