पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

Pune Crime News l देशभरात पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रचंड गाजला आहे. कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर येरवाडा पोलीस, ससून रुग्णालयातील डॉक्टर व आरोपीच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पूर्णपणे सापळा रचला होता. मात्र आता या प्रकरणाची चौकशी सखोल तपासणी करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांच्या ट्विटमुळे खळबळ :

पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे नागरिकांनी देखील प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. या पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या वडिलांनी त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र रचण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबाव आणून आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले हे स्पष्टपणे उघड झाले आहे.

https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1801089922008326410?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1801089922008326410%7Ctwgr%5E1ff7df8bfa341f7c61c2f0a440ae4121eb72313a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpune%2Fpune-porsche-car-accident-former-home-minister-anil-deshmukh-serious-accusation-government-trying-to-plant-alcohol-substance-in-anish-awadhiya-ashwini-costa-viscera-report-1290294

Pune Crime News l पोर्शे कार प्रकरणात नवा ट्विस्ट :

यासंदर्भात माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता आता पूर्णपणे तयारी देखील झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले दोघे तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असे न्यायालयात देखील सिद्ध करता येईल.

कारण या प्रकरणातील आरोपी मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने सध्या प्रयत्न सरु आहेत असा धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. मात्र आता या सगळ्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

News Title- Pune Porsche Car Accident Blood Samples Of Dead Youth Anil Deshmukhs Big Allegation

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

मला तिकिट मिळू नये, त्यासाठी पक्षातील लोकांनी सुपारी दिली; या खासदाराचा धक्कादायक आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंनी आखला पुढील मास्टर प्लॅन

सावधानता बाळगा! आज या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता