Pune Porsche car accident | पुण्यातील अपघात प्रकरणी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले. या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे. ससूनमधील ब्लड फेरफार प्रकरणात पोलिसांनी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.
आता अटकेत असलेल्या डॉ श्रीहरी हळनोरने मोठी कबुली दिली आहे. त्यामुळे डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोरवर डॉ. अजय तावरेने दबाव टाकल्याचं डॉ श्रीहरी हळनोरने पोलिसांना सांगितलं आहे.
डॉ. श्रीहरी हळनोरची मोठी कबुली
डॉ. तावरे व विशाल अग्रवाल यांचं बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव टाकला अशी हळनोरने कबुली दिली आहे. रक्त बदलण, माझ्या मनाला ते पटत नव्हत. माझ्याकडून मोठी चूक झाल्याच मला वाटत होतं अशी हळनोरने कबुली दिली आहे. डॉ. श्रीहरी हळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.
Pune Porsche car accident | तावरेंच्या अडचणीत वाढ
ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या तावरेंवर याआधी देखील आरोप करण्यात आले होते. अशात तावरेंचं एक जुनं प्रकरणं समोर आल्याने तावरेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.
डॉ. तावरेंनी 2018मध्ये ही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. रेहाना शेख यांचा 11 ऑगस्ट 2018ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती ने केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, धक्कादायक माहिती आली समोर
Biwi No: 1 सिनेमा गोविंदाने का सोडला?, 25 वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण
किंग खानला हरवून दीपिका पदुकोण बनली ‘क्वीन’! पाहा IMDb Top लिस्ट
शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती
पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता