Pune Porsche Car Accident | पुण्यात कल्याणीनगर येथे प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने नशेत पोर्शे कारनं दोघांना चिरडलं. या अपघातामध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाला आता जवळपास महिना उलटला आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका होणार
अल्पवयीन आरोपीला जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून त्याला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.आरोपी मुलाच्या आत्याने हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. या याचिकेमध्ये पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.
आता या मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सध्या आरोपी मुलाचे आई, वडिल आणि आजोबा हे पोलीसांच्या कोठडीत आहेत. आता अल्पवयीन आरोपीची 33 दिवसांनी बालसुधारगृहातून सुटका होत आहे. तसंच आता जे आदेश आले आहेत, त्यामध्ये पोलिसांबाबत काहीही म्हटलेलं (Pune Porsche Car Accident ) नाही.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात 18 मे च्या मध्यरात्री आणि 19 मे च्या पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात एक भयानक अपघात झाला होता. प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांना उडवलं. यामध्ये दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. अपघातापुर्वी मुलाने पबमध्ये पार्टी केली होती. अपघात झाला तेव्हा तेथे स्थानिकांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले होते. तसेच पबमध्ये पार्टी करताना देखील आरोपी मुलगा दिसला होता. पुढे या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तसेच जिथे पार्टी झाली होती त्या पब चालकाला अटक करण्यात आली. यानंतर आरोपी मुलाचे आजोबा सुरेन्द्र अग्रवाल यांनाही एका प्रकरणी अटक करण्यात आली. मद्य प्राशन केल्याने मुलाची ब्लड (Pune Porsche Car Accident )टेस्ट करण्यात आली होती. हे टेस्ट पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले होते.
मात्र, ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयामधील दोन डॉक्टरांनाही अटक झाली. पुढे आरोपी मुलाची आई देखील या प्रकरणी वादात सापडली होती. आरोपी मुलासह त्याचं पूर्ण कुटुंब तुरुंगात गेलं. या प्रकरणी पुणे पोलिसांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. अशात आज (25 जून) अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.
News Title – Pune Porsche Car Accident High Court Bail Granted To Minor Accused
महत्वाच्या बातम्या-
‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज
“हनिमूनच्या रात्री नवऱ्याने मित्राबरोबर माझा लिलाव..”; करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा
निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video
“..तर कंगनाला राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं”; संजय राऊतांचा टोला