पुण्यात पब आणि बारचालकांना दणका; कठोर नियम लागू होणार?

Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या प्रकरणी रोजच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने नशेत कार चालवून दोघांना उडवलं.

या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांचे व्हिडीओही समोर आले होते. यानंतर अल्पवयीन मुलांना दारू दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

पुण्यातील या अपघातानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. पुणे पोलिसांवर देखील यावरून मोठे सवाल करण्यात आले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लघंन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट यांच्यावर (Pune Porsche Car Accident) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या बैठकीत मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, याबाबत मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कोणते नियम लागू होणार?

1) परवाना कक्षा मध्ये 21/25 वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार

2) हॉटेल च्या ओपन टेरेसवर ( rooftop) मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.

3) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार

4) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना

5) महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.

6) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.

7) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड (Ban Party) परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-1 ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.

या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ (Pune Porsche Car Accident) लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title :  Pune Porsche Car Accident New Rules For Pubs And Bars

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं; जाणून घ्या आजचे दर

घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर!

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग