Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशात खळबळ माजलीये. या प्रकरणी सुरूवातीला पुणे पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल असल्याने सेटलमेंट झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा
अपघात (Pune Porsche Car Accident) झाल्याच्या रात्री तिथले स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे.
Pune Porsche Car Accident | “पोलीस ठाण्यात सुनील टिंगरे आले होते”
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी महत्त्वाचे दिले आहेत. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका अमितेश कुमार यांनी मांडली. त्या दिवशी पोलीस ठाण्यात आमदार सुनील टिंगरे आले होते, हे सत्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अपघातानंतर पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कायदेशीर आणि नियमानेच झाली आहे. ही कारवाई करताना पोलिसांवर कोणाचा दबाब नव्हता. तसेच पोलीस ठाण्यात आरोपींना पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याच्या आरोपात तथ्य नाही, असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला नाही. सुरुवातीला आरोपीचं ब्लड सँपल घेण्यात आलं होतं. ते फॉरेन्सिकला दिलं आहे. आम्ही ड्यु डेलिजन्स घेण्याच्या दृष्टीकोणातून आणखी ब्लड सँपल घेतलं होतं. पहिलं आणि दुसरं रक्त सँपल सेम आहे की नाही हे पाहण्यास आम्ही फॉरेन्सिकला सांगितलं आहे. आरोपीने अल्कहोल घेतलं होतं की नाही याची माहिती घेण्यासाठी पहिलं ब्लड सँपल घेण्यात आलं, असं आयुक्तांनी सांगितलं.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्ह्याची पूर्व कल्पना असल्याचं त्यात नमूद आहे. आपल्या हातून हत्या होऊ शकते हे आरोपीला माहीत होतं हे त्याच्या वर्तवणुकीवरून दिसून येतं, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; नव्या दाव्याने खळबळ
दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल
तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत