Pune Accident l पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एका दुचाकीला उडवले. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशातच आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणी अल्पवयीन वेदांतच्या वडिलांसह आजोबांना देखील अटक करण्यात आलं आहे.
अपघातावेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीने केला मोठा आरोप
याप्रकरणाचा सखोल तपास पुणे पोलिसांनी केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेधडकपणे कार चालवणाऱ्या मुलाच्या महागड्या कारने दोघांना चिरडले आहे. या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचं तपासात समोर आलं आहे.
या घटनेत मुलाच्या वडिल, आजोबांसह अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी बारचालकालाही अटक करण्यात आली आहे. अशातच आता घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी देखील पुढे येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणातील दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण घटनाक्रम जशाच तसा सांगितला आहे.
Pune Accident l तुला पाहिजे तेवढे पैसे घे, पण मला मारू नकोस
या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्यापासून केवळ 10 फूट अंतरावर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचं पाहायला मिळाल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा सातत्याने जोरजोरात ओरडत होता, तुला पाहिजे तेवढे पैसे घे, पण मला मारू नकोस, तुला पाहिजे तेवढे पैसे मी देईन वाटलं तर आत्ताच देतो असा तो वारंवार ओरडत होता.
मात्र या घटनेत अनेक बड्या बापाचा लाडावलेला सुपुत्राला वाचवण्यासाठी अख्खं प्रशासन सरसावलं असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आतापर्यंत या संपूर्ण घटनेत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पुणे पोलीस पुढील तपास करत आहे.
News Title – Pune Porsche Car Accident News
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप
मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी
कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?
कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका