Pune Porsche Car Accident | पुण्यात कल्याणीनगर येथे प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने नशेत पोर्शे कारनं दोघांना चिरडलं. या अपघातामध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. सध्या या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशात एक नवीन माहिती समोर आली आहे.
पोर्शे कारचा जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब समोर आला आहे.त्यांनी आरोपी मुलाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीट वर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी आपला जबाब नोंदवला आहे.
वेदांतसोबत कारमध्ये असलेल्या मुलांचा जबाब समोर
आरोपी अल्पवयीन मुलाने दारू पिऊन वेगाने गाडी चालवत अपघात केला असल्याचं या दोन मुलांनी जबाबात सांगितल्याचं समोर आलं आहे. आता या मुलांना पोलीस या खटल्यात साक्षीदार करणार असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
आरोपी मुलाच्या ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सध्या (Pune Porsche Car Accident )बिल्डर वडील विशाल अग्रवाल, ससून रुग्णालयमधील डॉक्टर अजय तावरे यांच्यासह अजून दोन डॉक्टर, विशाल अग्रवालचे वडील तथा आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्रअग्रवाल कस्टडीमध्ये आहेत.
आरोपी मुलाची चौकशी होणार?
तर,आरोपी मुलगा हा सध्या बाल सुधारणा गृहात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची चौकशी करायची आहे. त्यांनी त्या संदर्भात (Pune Porsche Car Accident ) बाल न्याय मंडळाला पत्र देखील पाठवले आहे. आरोपी मुलाची आई देखील या प्रकरणात अडकली असून त्या सध्या फरार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे बाल न्याय मंडळानं चौकशीची परवानगी दिल्यास अल्पवयीन आरोपीची चौकशी ही त्याचे वकील किंवा दुसऱ्या नातेवाईकांसमोर होऊ शकते. पुण्यातील या घटनेमध्ये अनेक धागेदोरे सापडत आहेत. आता या प्रकरणी पुढे काय होतं, ते पाहावं लागेल.
News Title – Pune Porsche Car Accident statement of children who were with the accused
महत्वाच्या बातम्या-
इम्तियाज जलिल यांनी घेतली जितेंद्र आव्हाडांची बाजू, म्हणाले…
पुण्यात पब आणि बारचालकांना दणका; कठोर नियम लागू होणार?
‘या’ दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडियाचे शिलेदार कोण असणार?
गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं; जाणून घ्या आजचे दर
घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट