Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कोर्टाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोघेही आता 31 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. तसेच याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही अटक करण्यात आली होती. त्यांनी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप होता. त्याप्रकरणी कोर्टाने डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला पोलिस कोठडी
आज (28 मे) पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आज कोर्टात ड्रायव्हरचं अपहरण आणि त्याला मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली.
कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही (Pune Porsche Car Accident) बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, अल्पवयीन मुलाला 4 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या (Pune Porsche Car Accident) डब्यात फेकलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेत पोलिसांना पाठवलं. त्यामुळे या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली.
कोर्टात सरकारी वकिलांकडून सखोल तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. ड्रायव्हरचा फोन या दोघांनी काढून घेतला आहे, जो अद्याप पोलिसांना दिलेला नाही. तो मोबाईल हस्तगत करण्यासाठी दोघांचाही तपास एकत्र करणं गरजेचं असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. मात्र, कोर्टाने अग्रवाल पिता-पुत्राला चार दिवसांपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
News Title – Pune Porsche Car Accident Surendra Kumar and Vishal Agarwal in police custody
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांना मोठा धक्का; ‘त्या’ घोटाळ्याची राज्य सरकारकडून पुन्हा चौकशी सुरू
“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा
भुजबळ यांच्यानंतर आता समता परिषदेचा मनुस्मृतीला विरोध
अबू सालेमसोबत कंगनाची पार्टी?; ‘त्या’ व्हायरल फोटोवर अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण