डॉ. अजय तावरेंचा पाय आणखी खोलात; जुनं प्रकरण समोर आल्याने खळबळ

Pune Porsche car accident | कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ब्लड सॅम्पलमध्ये बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक करण्यात आलीये.

डॉ. अजय तावरेंचा पाय आणखी खोलात

ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या तावरेंवर याआधी देखील आरोप करण्यात आले होते. अशात तावरेंचं एक जुनं प्रकरण समोर आल्याने तावरेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

यापूर्वीही तावरेंनी असे प्रकार केल्याचं आता समोर आलं आहे. शिरुरमधील शेख कुटुंबियांसोबतदेखील 2018 मध्ये तावरेंनी ब्लड रिपोर्ट बदलल्याचा प्रकार केल्याचं शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

Pune Porsche car accident | नेमकं प्रकरण काय?

डॉ. तावरेंनी 2018मध्ये ही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरूरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. रेहाना शेख यांचा 11 ऑगस्ट 2018ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती ने केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला.

पोलिस तपासात असं उघड झालं आहे की, डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता. या दरम्यान डॉक्टर आणि विशाल अग्रवालचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ वरून समोर आलं आहे. मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने ससूनमधील तावरेला व्हॉटसॲप कॉल केला होता. सध्या विशाल अग्रवाल आणि हा (Pune Accident) डॉक्टर दोघेही अटकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे, त्यांच्यामुळे..”; पुणे अपघातप्रकरणी नवी माहिती समोर

“आव्हाडांनी बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी, अन्यथा..”

जितेंद्र आव्हाडांनी चुकून फाडला बाबासाहेबांचा फोटो, राजकीय वातावरण तापलं

इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल