Pune Porsche Car Accident | पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी रोजच धक्कादायक खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालय देखील अडचणीत सापडलं आहे. आरोपी अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात येथील दोन डॉक्टर अटकेत आहेत.
आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवालने डॉक्टरांना पैसे खाऊ घालून ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली. आता या प्रकरणी अजून एक नवीन माहिती उघड झाली आहे. ब्लड रिपोर्ट बदलण्याचा सल्ला अटकेत असलेल्या डॉ. तावरेंनीच मुलाच्या वडिलांना दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन (Pune Porsche Car Accident ) विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनादरम्यान जवळपास दोन तासांत 14 वेळा विशाल अग्रवालसोबत फोनवर चर्चा केली.
विशाल अग्रवालचे डॉक्टरला 14 कॉल्स
डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप कॉल झाला. संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आला. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप वरून संवाद झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट (Pune Porsche Car Accident ) बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहिती मिळाली आहे. या दरम्यान डॉक्टर आणि विशाल अग्रवालचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ वरून समोर आले आहे. मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने ससूनमधील डॉ. अजय तावरेला व्हाटसॲप कॉल केला होता.
डॉक्टर आणि विशाल अग्रवाल सध्या पोलिस कोठडीत
पुण्यातील दुर्घटना प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट महत्वाची कडी आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच याबाबतचा खटला मजबूत होईल. पुणे पोलिसांना वेदांत पबमध्ये पार्टी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. मात्र या ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्यामुळे हे प्रकरण अजूनच गुंतून गेलं आहे. या प्रकरणी काल कोर्टाने डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यासोबतच अल्पवयीन आरोपी मुलाचे (Pune Porsche Car Accident ) वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
News Title – Pune Porsche Car Accident Vishal Agarwal called Dr Ajay Tavare to change the report
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!
…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा
मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप