Pune News l पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघाजणांनी आपले प्राण गमावले आहे. या घटनेनंतर मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
पोर्शे कार संदर्भात धक्कादायक माहिती समोर :
अल्पवयीन मुलगा हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशातच आता यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ती कार रजिस्टर देखील नव्हती. पोर्शे कार बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन पुणे येथे आणण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती पोर्शे कार अजूनपर्यंत रजिस्टर नव्हती. त्यामुळे ही कार तब्बल इतके दिवस विना रजिस्टर रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune News l मुलाने पोलिसांना दिली महत्वाची माहिती :
अशातच आता या सर्व प्रकारामुळे पुणे पोलिसांवर देखील मोठा प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी विना हेल्मेट संदर्भात देखील कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्च महिन्यापासून विनाक्रमांकाची कार धावताना कसे काय बघू शकले नाही? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मी कार चालविण्याचे कसलेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नाही, तरी देखील वडिलांनीच ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली आहे. तसेच मी मद्यप्राशन करीत असल्याचे देखील वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
News Title – Pune Porsche Car Accident
महत्त्वाच्या बातम्या-
आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!
सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल
आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी
पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या