पुणे | भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. तर खडसेंपाठोपाठ पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्ती देखील राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधणार आहे.
एकनाथ खडसेंपाठोपाठ पुण्याचे गोल्डमॅन अशी ओळख असणारे प्रशांत सपकाळ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंसोबतच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

प्रशांत सपकाळ हे पुण्याचे फार प्रसिद्ध गोल्डमॅन आहेत. सपकाळ हे तब्बल पाच किलो सोनं अंगावर परिधान करतात. याची किंमत जवळपास दीड कोटींच्या घरात आहे.
सपकाळ यांना लहानपणापासूनच सोनं तसंच दागिन्यांची आवड होती. प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर आहेत. तर आता ते राजकारणात देखील उतरणात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
…तर त्या देशाला मोठी किंमत मोजावी लागेल- जो बायडेन
आज एकनाथ खडसेंचा जाहीररित्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार!
मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया
पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला