पुणे महाराष्ट्र

‘काश्मीर ते कोल्हापूर सायकल टूर’मधील पुण्यातील सायकलपटूचं अपघाती निधन

पुणे | काश्मीर ते कोल्हापूर या सायकल मोहिमेतील पुण्यातील सायकलपटूचं अपघाती निधन झालं आहे. प्रवीण ताकवले असं त्यांचं नाव आहे. सकाळच्या अॅग्रोवन दैनिकात ते आर्टिस्ट होते.

ताकवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू येथून 13 ऑगस्ट रोजी सायकल मोहिमेला सुरूवात केली होती. एकूण 8 सायकलपटू या मोहिमेत सहभागी झाले होते. मंगळवारी ते बिकानेरहून जोधपूरला जात असताना हा अपघात झाला.

ताकवले आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी रात्री नागडी गावाजवळील हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर पेट्रोलपंपावर ठेवलेल्या सायकली आणण्यासाठी ते पायी जात होते. तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात ताकवले यांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, ताकवले उत्कृष्ट डिझायनर आणि लोगो आर्टिस्ट तर होतेच याशिवाय एक उत्तम ट्रेकर, धावपटू, जलतरणपटू आणि सायकलपटू अशी त्यांची ओळख होती. ते स्वतः कार्यालयात येण्या-जाण्यासाठी खडकवासला ते शनिवारवाडा अशी रोज सायकल चालवत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन

-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा

-मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही- राज ठाकरे

-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता

-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या