ऐकावं ते नवलच!, पुण्यात फक्त ३०० रुपयांत केलं लग्न

Chanakya Niti for married life

पुणे : दिवाळीनंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासून लग्नाचा हंगाम सुरु होतो. लग्नाच्या पत्रिका, कपडे, दागिने, हॉल, केटरिंग आणि इतर सजावटीवर वारेमाप खर्च केला जातो. या सगळ्याचा आर्थिक भार वधुपित्याला सहन करावा लागतो. परंतु, बदलत्या काळानुसार, विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देत, रजिस्टर पद्धतीने (Registered Marriage) लग्न करण्याकडे पुणेकरांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात तब्बल ५,७९९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

गेल्या पाच वर्षांत २४ हजारांहून अधिक जोडप्यांचे रजिस्टर मॅरेज

पुणे आणि परिसरात गेल्या पाच वर्षांत २४ हजारांहून अधिक जोडप्यांनी रजिस्टर पद्धतीने (Registered Marriage) लग्नगाठ बांधली आहे. २०१९ मध्ये ७,०५९, २०२० मध्ये ५,२३८, २०२१ मध्ये ७,५४६, २०२२ मध्ये ७,५५८ तर २०२३ मध्ये ५,४०० जोडप्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. २०२४ मध्ये हा आकडा ५,७९९ वर पोहोचला आहे.

अवघ्या तीनशे रुपयांत होते Registered Marriage

रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासाठी अवघे तीनशे रुपये खर्च येतो. नोटीस लावण्यासाठी २०० रुपये तर विवाह नोंदणीसाठी १५० रुपये फी आकारली जाते. विशेष म्हणजे, ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येते.

पालकांची संमती नसली तरीही करता येते नोंदणी पद्धतीने लग्न

बहुतेकदा प्रेमविवाह करणारी जोडपी रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. पालकांची संमती नसली तरीही जोडप्याला कायदेशीररित्या विवाह करता येतो.

आवश्यक कागदपत्रे

विवाह नोंदणी करण्यासाठी वधू आणि वर या दोघांचे आधार कार्ड, वयाचा पुरावा म्हणून टीसी किंवा सनद आणि दोघांपैकी एक जण स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे. मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ पूर्ण असणे बंधनकारक आहे.

नोंदणी अधिकारी संगीता जाधव यांचे मत

“वर आणि वधूला विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि ३० दिवसांनंतर प्रत्यक्ष विवाह करणे अशा दोन कामांसाठीच यावे लागते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्याने वधू-वरांचा वेळ वाचत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात आता रजिस्टर मॅरेजला पसंती देत आहेत,” असे विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन?, बड्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ड्रेसिंग रुममधील चर्चेनं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ, गौतम गंभीर म्हणाला…

सानिया मिर्झा मोहम्मद शमीला करतेय डेट?, दोघांचे स्विमिंगपूलमधले फोटो तूफान व्हायरल

रोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती?, आताच्या घडीची महत्त्वाची घडामोड

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .