…हे सरकार खुनी आहे; पुण्यात शेतकरीपुत्रांची निदर्शनं

पुणे | शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनामुळे शेतकरीपुत्रांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पुण्यात शिकणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या अशाच काही शेतकरीपुत्रांनी ‘गुडलक स्ट्रीट’वर सरकारविरोधात निदर्शनं केली. 

धर्मा पाटील यांची जमीन सरकारनं संपादित केली होती, मात्र त्यांना योग्य मोबदला दिला नव्हता. मंत्रालयात खेटे मारुन कंटाळलेल्या धर्मा पाटील यांनी अखेर विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, पुण्यात निदर्शनं करणाऱ्या युवकांनी हातात ‘हे सरकार खुनी आहे’ असं लिहिलेले फलक घेतले होते तसेच तोंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या. यावेळी दयानंद शिंदे पाटील (बीड), संकेत पडवळ, कुलदीप आंबेकर(उस्मानाबाद), संध्या सोनवणे(नगर),  आकाश झांबरे(पुणे), किरण सूळ(सातारा) उपस्थित होते.