पुण्याला सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा मिळणार!

पुणे | पुण्याला सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा मिळणार आहे. कारण 1 लाख सायकली भाड्याने देण्याचे धोरण पुणे महापालिकेने आखले आहे. पुणे पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टिम असं या धोरणाचं नाव आहे. 

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी एकात्मिक सायकल आराखडा तयार केलाय. स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे. 

साधारणतः शंभर लोकांमागे एक सायकल अशा एक लाख सायकली रस्त्यावर उतरवण्याचा विचार आहे. पालिकेला सायकलींसाठी एक रुपयाची खर्च करावा लागणार नाहीये कारण काही संस्थांनी ही योजना राबवण्यासाठी स्वतः पालिकेकडे विचारणा केलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या