Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ

पुण्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पहायला मिळाला. या पावसानं अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी मोठी हानी देखील झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यातील या पावसाचं रौद्ररुप दाखवणारे हे काही व्हिडीओ-

पुण्याच्या सोमवार पेठेत सदाआनंद नगर नावाचा भाग आहे. या भागातील एका इमारतीवर असलेला मोबाईल टॉवर आजच्या पावसामुळे कोसळला. याचा व्हिडीओ कॅमऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

 

पुण्याच्या जंगली महाराज रोडवरील संचेती रुग्णालयासमोरील मोठा लोखंडी दिशादर्शक फलक आजच्या पावसामुळे कोसळला. एरवी या रस्त्यावर मोठा गर्दी असते, मात्र कोरोनामुळे या रस्त्यावर वर्दळ नसते, त्यामुळे याठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला आहे.

 

बाजीराव रोडवरील विश्रामबागवाड्यासमोरील एक व्हिडीओ तर चक्क काळजाचा ठाव चुकवणारा ठरला. उन्हापासून आपलं संरक्षण करणारं छत्र वाचवण्यासाठी एका पोलिसाची सुरु असणारी कसरत या व्हिडीओत दिसत आहे.

 

पुण्यात झालेल्या या पावसानं अनेक झाडं जमीनदोस्त झाली, या झाडांखाली अडकल्यामुळं काही गाड्यांचे तसेच रिक्षांचं मोठं नुकसान झालं आहे. काही घरांवर देखील झाड कोसळल्याची माहिती आहे.

 

पुण्यातील या पावसासह जोरदार वारा देखील पहायला मिळाला. या वाऱ्याचा तुफान वेग अनेकांच्या मनात धडकी भरवणारा ठरला. या वाऱ्यामुळे पुण्याच्या अनेक भागात नुकसान झालेलं पहायला मिळालं. याच वाऱ्यामुळे अनेक भागात झाडं कोसळली.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

महत्वाच्या बातम्या-

परप्रांतीय मजूर, कामगार विद्यार्थी तसंच पर्यटकांना आता आपल्या घरी जाता येणार; केंद्राचा मोठा निर्णय

इरफानसोबत शेवटचा सिनेमा करणाऱ्या ‘या’ तिघांच्या बोलक्या प्रतिक्रिया!

दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या पत्रात इरफाननं व्यक्त केली होती मृत्यूची शक्यता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या