बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पुणे | भारतातील पहिली रेल्वे सुरु झाल्यानंतर काही पाच ते सहा वर्षातच पुणे येथे रेल्वे सुरु करण्यात आली. 27 जुलै 1925 साली पुण्यात या विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली व मोठया दिमाखात तिचं उद्घाटन झालं. ऐतिहासिक वारसा असलेल्या या पुण्याच्या रेल्वेस्थानकाला आज मंगळवारी तब्बल 96 वर्ष पूर्ण होत आहेत.

पुणे हे लष्कराचे प्रमुख ठिकाण असल्यानं ब्रिटिशांनी पुण्यातील रेल्वेसाठी विशेष लक्ष दिले. मुंबई-ठाणे या रेल्वे स्थानकांनंतर पुणे हे सर्वात जुनं स्थानक आहे. 1929 मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील रेल्वे धावली. 1930 मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन गाडीही यावेळी सुरू झाली. याचदरम्यान आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेसही पुण्यात सुरु झाली.

स्थानकात दररोज येणाऱ्या वीस गाडय़ांपासून 230 गाडय़ांपर्यंतचा प्रवास या स्थानकानं अनुभवला आहे. मर्यादीत असलेल्या पुणे स्टेशनचा कालांतरानं विस्तार होत गेला. पुण्याच्या इमारतीला काही वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणं या इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे.

दरम्यान, अनेक गोष्टींचा व रेल्वेच्या वाढत्या व्यापाचा साक्षीदार असलेल्या या स्थानकानं आता 97व्या वर्षात पदार्पण केलं आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा या दरवर्षी या स्थानकाचा वाढदिवस साजरा करत असतात.

थोडक्यात बातम्या –

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More