बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्लॅटफॉर्म तिकीट दरात ‘इतक्या’ रुपयांची घट

पुणे । कोरोना काळात रेल्वे स्टेशनवरती गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली होती. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आजपासून पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट दरात घट झालेली पहायला मिळाली.

आजपासून पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म तिकिटाची किंमत 40 रूपये कमी करून 10 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा पुण्यातील सर्व सामान्य लोकांना होणार आहे.

मध्य रेल्वेने पुण्यातील प्लॅटफाॅर्म तिकीट दर आजपासून दहा रुपये करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अधिसुचनेनुसार कोविड महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे.

आजपासून पुन्हा पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची सामान्य विक्री सुरू करण्यात आली आहे. आजपासून पुन्हा प्लॅटफाॅर्म तिकीट 10 रूपये प्रती व्यक्ती करण्यात आले आहे. कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी तिकिट दरात वाढ करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ‘ही’ मोठी घोषणा

Budget 2022: ‘इतक्या’ लाख नव्या नोकऱ्या देणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2022: 1 फेब्रुवारीपासून तुमच्या खिशावर होणार परिणाम, बदलणार ‘या’ गोष्टी

‘पुष्पा असो किंवा फुसका लेकिन झुकेगा नही साला’; भाऊ कदमचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

“तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More