पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video

Pune Rain Alert | महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर मुसळधार पावसामुळे चर्चेत आले आहे. शहरातील अनेक भागात पाणी पावसाचे पाणी साचले आहे. काही इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा इतका जोर वाढल्याने इथे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर (Pune Rain Alert) सध्या पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका युजरने रस्त्यावर पाणी साचल्याचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे फोटो पाहा, पुणे दरवर्षी पावसाळ्यात वाईट शहर म्हणून नवीन रेकॉर्ड बनवत आहे. चला पोहायला जाऊ या.”

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

तर, दुसऱ्या एका युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिलेय की, “बाणेर, मुळा नदीला पुर येईल अशी परिस्थिती” तर अजून एका युजरने एका इमारतीचा फोटो शेअर केला आहे. या इमारतीचे नाव आहे ‘रिव्हर व्हू ए’ या इमारतीच्या खाली नदीसारखे पाणी साचलेले दिसत आहे.

दरम्यान, पुण्यात अनेक भागात नागरिक अडकले आहेत. त्यांना पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून यशस्वीरित्या सुखरुप सुरक्षितस्थळी पोहोचवले जात आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक (Pune Rain Alert) भागांमध्ये पाणी साचलं आहे.

पुण्यात पावसाचा हाहाकार

खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक परिसरात पाण्याची वाढ झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले (Pune Rain Alert) आहेत.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून 35574 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर 200 मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.

News Title – Pune Rain Alert 25 july 

महत्त्वाच्या बातम्या-

पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..

“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल

“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, विधानसभा स्वबळावर लढणार”; राज ठाकरेंची मोठी घोषणा

पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…

पुण्याला पावसाने धो-धो धुतलं! जनजीवन विस्कळीत, 24 तासातली आकडेवारी धक्कादायक