पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune Rain | पुणे शहरात पावसाने (Pune Rain) धिंगाणा घातला आहे. पुणे शहरातील काही भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर काही नागरिकांच्या घरात देखील पाणी गेल्याचं दिसून आलं आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड येथे नदीकाठच्या वसाहतीत पाणी साचलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसाचा जोर आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष ठेऊन आहेत.

मुंबई, पुणे, लातूर, हिंगोली, परभणी, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली येथे मुसळधार पावसाची परिस्थिती दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या चार तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे गेल्या काही तासांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. नदी, नाले वाहताना दिसत आहेत. पुणे महापालिकेने 8 बोटी मदतीसाठी नियुक्त केल्या आहेत. (Pune Rain)

पुणे शहरात मुसळधार पावसात तिघांचा मृत्यू

अशातच आता पुण्यात मुसळधार पावसात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू मुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करताना दिसत होते. पुणे महानगरपालिकेचा टिळक पूल पाण्याखाली गेला. यामुळे याभागातील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. (Pune Rain)

पुणे (Pune Rain) शहरातील विविध सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. इमारतींच्या काही पार्किंमध्ये पाणी शिरलं आहे. सिंहगड रोड येथे देखील पावसाचे पाणी साठलं आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. यामुळे हे पाणी आता कुंडमळा येथील पुलाजवळ आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस दिसून आला. पुणे येथील खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे पुणे प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाने खाण्याची आणि पाण्याची सुविधा केली आहे. (Pune Rain)

News Title – Pune Rain Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”

राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

ऐश्वर्या-अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण