पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार

Pune Rain | पुण्याला आज (4 ऑगस्ट) हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क (Pune Rain ) राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.यामुळे कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.

खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. या भागात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधानतेचा इशारा(Pune Rain ) देण्यात आला आहे.

पुण्याला आज रेड अलर्ट

तर, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची पथके तैनात ठेवलेली असून नागरिकांनी सतर्क राहत प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, ही विनंती!”, असं ट्वीट मोहोळ यांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्याबरोबरच(Pune Rain ) हवामान विभागाने आज मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भाला (Maharashtra Rain Update) यलो अलर्ट दिला आहे.

News Title-  Pune Rain red alert for Pune

महत्वाच्या बातम्या-

“…तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता..

सतर्क! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

“कंगना राणौतचा चेहरा पाहिला तर पाप..”; शंकराचार्य यांचं वक्तव्य चर्चेत

आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा