पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली

Pune Rain Update | पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे येथे धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण (Pune Rain Update ) झाली आहे.

एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून घरातील सर्व सामान (Pune Rain Update ) पाण्याखाली गेलं आहे. इतकंच नाही तर अनेक नागरिक हे पाण्यामुळे घरात अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील अनेक भाग गेले पाण्याखाली

येत्या काही तासात पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु (Pune Rain Update ) असल्याने मुठा नदीला पुर आला आहे. यामुळे डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.

परिस्थिती पाहता पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. पण, पावसाचा जोर वाढत चालला असल्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल असं जलसंपदा विभागाने म्हटल्याचं कळतंय. त्यातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही घटना घडली आहे.

पुण्यात धडकी भरवणारी परिस्थिती

अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढल्याने पुण्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू करण्यात आला असून रात्री भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे.

तसेच पिंपरी चिंचवड येथील पवना (Pune Rain Update ) नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे हे पाणी आसपासच्या भागातही जाऊ शकते. यामुळे पूरजन्य परिस्थिती दिसून निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या लोणावळा या भागातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लोणावळ्यातील शाळांना सुट्टी दिली गेलीय.

News Title –  Pune Rain Update 25 july

महत्त्वाच्या बातम्या-

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”

राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

ऐश्वर्या-अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

पावसाळ्यात ‘हे’ अन्नपदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील पोटाचे गंभीर विकार