पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

Pune Rain Update | पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातील अनेक घरात सध्या पाणी शिरले आहे.नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांना आज सुट्टी (Pune Rain Update )देण्यात आली आहे.

सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या जवानांकडून बाहेर काढले जात आहे.

पुण्यात पावसाचा धुमाकूळ

येत्या काही तासात पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु (Pune Rain Update ) असल्याने मुठा नदीला पुर आला आहे. यामुळे डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.

तसेच कॉर्पोरेशन जवळील पूल आणि होळकर पूल परिसर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.

हवामान विभागाने पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घ्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांचं ट्वीट

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या(Pune Rain Update ) बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे.

News Title –  Pune Rain Update ajit pawar in Action mode

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”

राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

ऐश्वर्या-अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण