“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल

Pune Rain Update | पुण्यात पावसाने कहर केला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुण्यात गेल्या 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झाला असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासात तब्बल 556 मिलिमीटर पावसाची (Pune Rain Update) नोंद झाली आहे.

पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात तर पावसाने थैमान घातलं आहे. येथे गुडघाभर पाणी साचले आहे. त्याचबरोबर राजगुरू परिसरात देखील पाणी साचले आहे. तर कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. लोणावळा परिसरामध्ये मागील 48 तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सहारा पूल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या ( Pune Rain Update) परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला आहे.

पुण्याला पावसाने झोडपून काढले

सिंहगड रोड परिसरात अनेक नागरिक अडकल्याने येथे सक्यु ऑपरेशन सुरु आहे. पुणेकरांना या स्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच काही नागरिकांनी थेट स्थानिक आमदारांवर संताप व्यक्त केला आहे.

माधुरी मिसाळ आणि भीमराव अण्णा तपकीर हे दोन्ही पुण्याचे आमदार आहेत. एका नागरिकाने “माधुरी ताईंचा हा वॉर्ड नाहीय, तरी त्या काम करत आहेत. भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत?”, असा सवाल करत संताप व्यक्त केला. तर, एकाने माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?, असा सवाल ( Pune Rain Update)उपस्थित केला आहे.

पुणेकरांचा संताप

पुण्यातील रस्त्यांना सध्या नदीचे स्वरूप आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे येथील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर, शहरातील शासकीय कार्यालयांना सुटी नाही. इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुटी देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून येथे ( Pune Rain Update)रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News Title – Pune Rain Update Flood Situation

महत्त्वाच्या बातम्या-

“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, विधानसभा स्वबळावर लढणार”; राज ठाकरेंची मोठी घोषणा

पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…

पुण्याला पावसाने धो-धो धुतलं! जनजीवन विस्कळीत, 24 तासातली आकडेवारी धक्कादायक

पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर