Pune Rain | पुणे शहर आणि जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपलं आहे. पुणे क्षेत्रातील धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुणे शहरात पावसाने पुन्हा थैमान घातलं आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत 85.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे खडकवासला धरणातून 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे. घरात पुन्हा एकदा पाणी शिरण्याची शक्यता असल्याने पुणेकरांना टेन्शन आलं आहे. (Pune Rain)
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस
पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे. यामुळे चारही धरणाच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. दरम्यान गतवर्षी उन्हाळ्यात पुणेकरांची धडधड वाढली होती. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली.
मात्र दमदार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणाचत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. (Pune Rain)
पुणे जिल्ह्याच्या ‘या’ धरणातील पाणलोट क्षेत्रात वाढ
जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. खडकवासला धरणात पावसाने थैमान घातलं. रविवारी पानशेत धरणात 4,712 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. (Pune Rain)
खडकवालामधून 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग झाला. पावसानुसार पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक करण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन केलं आहे. (Pune Rain)
News Title – Pune Rain Update Panshet-Kadakwasla Dam
महत्त्वाच्या बातम्या
“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘इथे’ करा झटपट अर्ज
वरळीत पुन्हा हिट अँड रन; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले
राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..
महादेवाच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे मार्गी लागतील!