पुण्याला पावसाने धो-धो धुतलं! जनजीवन विस्कळीत, 24 तासातली आकडेवारी धक्कादायक

Pune Rain Update | पुणे शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात गेल्या 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झाला असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासात तब्बल 556 मिलिमीटर पावसाची  (Pune Rain Update) नोंद झाली आहे.

लोणावळा ,शिरगाव , कोयना परिसरात पावसाने नुसताच धुमाकूळ घातला आहे. ताम्हिणी मध्ये 556 मिलिमीटर, लोणावळ्यात 311 मिलिमीटर तर शिरगाव मध्ये तब्बल 484 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. तर गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर , शितळादेवी मंदिर ,डेक्कन, संगम पूल समोरील वस्ती, कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात तर पावसाने थैमान घातलं आहे. येथे गुडघाभर पाणी साचले आहे. त्याचबरोबर राजगुरू परिसरात देखील पाणी साचले आहे. तर कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. लोणावळा परिसरामध्ये मागील 48 तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सहारा पूल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या ( Pune Rain Update) परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला आहे.

पुण्यात गेल्या 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस

येथील सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन वाहत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व पर्यटन स्थळांना बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास बंदी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 25 जुलै म्हणजेच आज पासून ते 29 जुलै पर्यंत मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे तीन जणांनी आपल्या जीव गमावला आहे. विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Rain Update)

पुण्यात विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करणाऱ्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रात्री गाडी बंद करून आवरत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने भूर्जी गाडी बंद करण्याचा या तिघांनी निर्णय घेतला. मात्र हे सगळं करत असतानाच तिघांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या पुण्यातील ( Pune Rain Update) अनेक ठिकाणी कमरे इतके, छाती इतके पाणी साचले आहे. इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर एकता नगर परिसर पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे येथील विजेचा प्रवाह हा बंद करण्यात आला आहे.

News Title – Pune Rain Update today 25 july 

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”