पुणेकरांनो सतर्क राहा! आज अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Pune Rain Update | पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाचा जोर अजूनही कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे खडकवासला धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुण्यात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे पुणेकरांची धडधड वाढली आहे. (Pune Rain Update )

पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा 31 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपत्रात करण्यात आला. यामुळे शहरातील नदीकाठचा रस्ता जलमय झाला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

आज 26 ऑगस्टरोजी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात पुन्हा पुर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने सर्व तयारी केली आहे. शहरातील 41 बाधित ठिकाणांवर आपत्कालीन टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

पुणेकरांनो आपत्कालीन परिस्थितीत ‘या’ नंबरवर संपर्क करा

41 बाधिक भागात आरोग्य विभाग, घनकचरा विभाग, व्यवस्थापन विभाग अशा अनेक पथकांना महापालिकेकडून सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी 020-25501269, 020-25506800 हे दोन नंबर जारी करण्यात आले आहेत. एकता नगर, भिडे पूल, शिवणे पूल, पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल या परिसरात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Pune Rain Update )

नाशिक आणि कोल्हापुरात देखील पावसाचा जोर वाढला

हवामान विभागाने आज पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अलर्ट राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पुण्यासाह नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. गंगापूर धरणांतून दोन दिवसांपासून 8 हजार 428 क्यूसेक वेगाने गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. (Pune Rain Update )

याचबरोबर कोल्हापूर येथे देखील सध्या मुसळधार पाऊस होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी 26 फूट पाच इंचावर पोहोचली आहे. तर, जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

News Title – Pune Rain Update today 26 august  

महत्त्वाच्या बातम्या-

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप, महायुतीच्या 2 आजी-माजी आमदारांमध्ये कलह

युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला

आज गोकुळाष्टमी! कृष्णाच्या कृपेने ‘या’ 5 राशीचं नशीब उजळणार

मलायका अरोराच्या लेकाचा सावत्र आईसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल