पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ

Pune Crime l पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यासंदर्भात पुणे पोलीस देखील सखोल कारवाई करत आहेत. मात्र या सर्व घटनेमुळे पुण्यातील पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

राजगुरूनगर पोलिसांची मोठी कारवाई :

सध्या पुणे पोलिसांनी एका कॅफेवर आणि लॉजवर छापा टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी त्या ठिकाणी भयावह वास्तव समोर आलं आहे. पोलिसांना या कॅफेवर टाकलेल्या छाप्यामध्ये कॉलेजमधील तरुण-तरूणी तिथे नको त्या अवस्थेत दिसले आहेत. त्यावेळी असे दिसून आले की, कॅफेच्या नावाखाली इश्काचा खेळ रंगताना दिसला आहे. त्यामुळे पुण्यात या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

आजकाल प्रशासनाच्या नियमांनुसार लॉजमध्ये जाण्यावेळी तिथे ओळखपत्र दाखवावं लागत असल्यामुळे आता हे तरुण कॅफेकडे वळली आहेत. काहींनी तर हा व्यवसायच सुरू केला आहे. तिथे कॅफेच्या नावाखाली युवा तरुणांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक जोडप्यासाठी विशेष सोय देखील उपलब्ध करून देण्यात येते. ओळखपत्र न दाखवता प्रवेश मिळत असल्याने जोडपी जास्तीचे पैसे देण्याची देखील तयारी दर्शवतात. पण कॅफे चालकांना कारवाईची भीती का नाही? असा प्रश्न समोर येत आहे.

Pune Crime l नेमकं प्रकरण काय आहे? :

पुणे येथील राजगुरुनगर शहरातील लॉज आणि कॅफेवर राजगुरुनगर पोलीसांनी अचानकपणे छापासत्र सुरु केलं. त्यावेळी राजगुरूनगर पोलिसांना कॉलेजमधील तरूण-तरूणी अश्लिल प्रकार करत असताना आढळुन आली आहेत. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कॅफेच्या नावाखाली अंधार करुन महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा हा अश्लिल प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

सध्या पुणे शहरातील पब व बार प्रकरणांनंतर पुण्याच्या ग्रामीण भागात लॉज आणि कॅफेमध्ये महविद्यायतीन विद्यार्थांना प्रवेश देऊन आश्लिलतेचा घृणास्पद व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व घटनेनंतर राजगुरुनगर पोलीसांनी राजगुरुनगर नगरपरिषद प्रशासनासोबत संयुक्त कारवाईला सुरूवात देखील केली आहे.

News Title – Pune Rajgurunagar Police Raided The Cafe Obscene Acts Were Going On There

महत्त्वाच्या बातम्या

पुढील काही दिवसांत ‘या’ राशीच्या व्यक्तींना राजकारणातून गोड बातमी मिळेल

मनोज जरांगेंच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येणार, तारीख आली समोर

महायुतीसाठी चिंताजनक बातमी; भाजपला पहिला धक्का महाराष्ट्र देणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी!

“इंडिया आघाडीचं सरकार बनताच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल”