बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 853 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 388 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 2 व्यक्ती पुण्याबाहेरील आहे.

पुण्यात सध्या 281 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,46,049 इतकी आहे. तर पुण्यात 5551 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4869 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,42,029 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8013 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन एका गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे-पिंपरीचिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातील एमसीसीआयएमचे मेंबर्सचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या – 

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे

‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर लक्षात आलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More