बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान… आणखी इतके दिवस राहणार पावसाचा मुक्काम!

पुणे | गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहराला देखील पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. आज सकाळी पावसाचा जोर वाढल्यानं पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली होती. अशातच आता पुणे वेधशाळेनं पुण्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.

पुण्यातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे चालू आहेत. यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहत आहे. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. आज अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची सलग चालू असणाऱ्या पावसामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली.

तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने आणि जोरदार पावसामुळे नदीतील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे डेक्कन मधील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा विसर्ग वाढवला असल्यानं जलपर्णी मोठ्या प्रमाणात पुलाखाली अडकली होती. यामुळे आज नदीतील पाण्याचा प्रवाह अडला होता.

दरम्यान, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत खडकवासला धरण 95 टक्के क्षमतेनं भरलं होतं. यामुळे काल साडेचार वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग  सुरु करण्यात आला होता. सध्या खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच पावसाची संततधार अशीच चालू राहिली तर पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचं महानगरपालिकेनं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कौतुकास्पद! 20 फूट पाण्यात उडी घेत तरूणाने देशी जुगाड करत 5 महिलांना आणलं मृत्युच्या दाढेतून माघारी

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मदतीची मागणी

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More