बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 1 हजार 105 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 8 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 341 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,14,830 इतकी आहे. तर पुण्यात 9740 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4925 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,00,165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8602 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या – 

भारताची खराब सुरुवात; केएल राहूल पाठोपाठ विराट शुन्यावर बाद

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

मलाच चपलीने मारलं! ‘या’ कारणाने महिलेच्या नाकातून येत होतं रक्त, डिलिव्हरी बॉयचा वेगळाच दावा

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More