बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. आज शहरात दिवसभरात तब्बल 830 नवे कोरानाबाधित आढळून आले आहेत. शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, अनेक जण खासगी प्रयोगशाळांमधुन तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 830 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 551 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 9 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 4 व्यक्ती पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 300 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 20 लाख 63 हजार 083 इतकी आहे. तर पुण्यात 6 हजार 160 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 881 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 19 लाख 53 हजार 042 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7 हजार 267 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, अनेक जण खासगी प्रयोगशाळांमधुन तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी!

‘जैश ए हिंद या नावानं…’; अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचा गंभीर आरो

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांच नवं गाणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More