पुणे महाराष्ट्र

गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात रात्रभर मिळणार मिसळ

Loading...

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही मोठ्या आकर्षणाचा विषय असते. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी ओसंडून वाहते. ही मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. कारण त्यांना आता रात्रभर मिसळ मिळणार आहे.

विसर्जनाच्या रात्री पुण्यात मोठी गर्दी असते, मात्र मध्यरात्रीनंतर लोकांची खाण्याची मोठी गैरसोय होते. हीच गैरसोय लक्षात घेता म्हात्रे ब्रीजजवळील साईछाया मिसळ हाऊसने रात्रभर मिसळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

नळस्टॉप आणि म्हात्रे ब्रीजजवळच्या मेहेंदळे गॅरेज चौकात साईछाया मिसळ हाऊस आहे. सेलिब्रेटींची रेलचेल असल्यानं हे मिसळ हाऊस प्रसिद्ध आहे. इथं खास काळ्या रस्स्यातील मिसळ मिळते.

दरम्यान, गणेशभक्तांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. तसेच ढोल-ताशा पथकातील तरुण-तरुणींना आयकार्ड दाखवल्यास १० टक्के सूट देतो, असं या मिसळ हाऊसचे मालक मंगेश काळे यांनी सांगितलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या