पुणे | पुण्याच्या हडपसर भागातील बेपत्ता झालेलं सातव आणि मगर कुटुंब अखेर सापडलं आहे. पानशेतमधील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामाला होते. अतिपावसामुळे त्यांचे मोबाईल बंद येत होते.
सातव आणि मगर कुटुंब पानशेतला फिरायला गेलं होतं. मात्र त्यांचा संपर्क तुटल्यामुळे त्यांचे नातेवाईक काळजीत पडले होते. शोधाशोध करुनही न सापडल्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, वृत्तवाहिनीवर बातमी पाहिल्यानंतर या कुटुंबाने लँडलाईनवरुन नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर आता हे कुटुंब पुण्याला निघाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!
-ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन
-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा
-मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही- राज ठाकरे
-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता