Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Loading...

पुणे | सध्या कोरोनामुळे रहदारी नसल्याने अनेक रखडलेली कामं मार्गी लावण्यास राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. अशाच पद्धतीने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या सूचना पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या अगदी गेटच्या समोर असलेला हा पूल विचित्र पद्धतीने बांधण्यात आला होता. आता इथून जाणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी देखील हा पूल अडचणीचा ठरत होता. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून याठिकाणी वाहने आणि मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यास अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता पुण्यात लॉकडाऊन आणखी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला कालावधी आहे.  टाटा कंपनीनेही या कामासाठी तयारी दर्शवली आहे. नवीन पुलासाठी 250 कोटींचा खर्च येणार असून तो उभारण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन हा पूल आताच पाडणे सोयीस्कर ठरणार असल्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत सहमती झाल्याचं कळतंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

महत्वाच्या बातम्या-

“सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसऱ्यांदा वाढू शकतात”

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या