तातडीची भेट घ्यायला पोहोचले उदयनराजे; शरद पवार म्हणाले, “थोडं थांबा!”

पुणे | सातारा लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादीत चांगलीच उलथापालथ सुरु असल्याचं दिसतंय. उदयनराजे विरोधक आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.

उदयनराजेंनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी सकाळच्या भेटीबाबत उदयनराजेंशी चर्चा केली. मात्र उदयनराजेंना हव्या असलेल्या उत्तराला होकार न देता पवारांनी त्यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला. 

तत्पूर्वी सकाळी आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह साताऱ्यातील आमदारांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली. उदयनराजे सोडून कोणालाही तिकीट द्या, आम्ही त्याला निवडून आणतो, अशी मागणी या आमदारांनी केली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंनी आमच्या पक्षाचं नेतृत्व करावं; आणखी एका पक्षाची इच्छा

-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना निवडणूक लढता येणार नाही?

-चिल्लर’ लोकांना मी महत्व देत नसतो, या चांडाळ चौकडीला मी पुरून उरेन- रावसाहेब दानवे

-… तर भाजपसोबत जाऊ; राजू शेट्टी

-पवारसाहेब, उदयनराजेंना सोडून कोणालाही तिकीट द्या, आम्ही त्याला निवडून आणतो!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा