Loading...

पुण्याच्या शिक्रापूरमध्ये महिला अत्याचाराची धक्कादायक घटना

पुणे | पुण्याच्या शिक्रापूर येथे कामासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या प्रकारामुळे पीडितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. सध्या तिच्यावर रुग्णलायात उपचार सुरु आहेत.

संतोष सासवडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ तारखेला घडलेल्या या घटनेचा आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.

Loading...

पीडित महिला मूळची धामारी येथील रहिवासी असून ती कामानिमित्ताने शिक्रापूर येथे आली होती. आरोपी संतोष सासवडेने रस्त्यात गाठून तिचा विनयभंग केला.

या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिलेनं विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना पुणे जिल्ह्यातही अशाच पद्धतीचे गुन्हे घडू लागल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

Loading...

-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

-मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एका महिन्याचा पगार

Loading...