पुणे महाराष्ट्र

रात्रीच्या वेळी डाॅक्टरनं चेकअपसाठी बोलावलं, अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे | शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील डॉक्टरने चक्क आपल्याच दवाखान्यातील रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना आहे. त्यानंतर सदर डॉक्टरवर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सदर पिडीत महिला शिक्रापूर (ता. शिरूर ) येथील रहिवाशी आहे. आजारी असल्याने तिने काही दिवस शिरूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पिडीतेच्या वडिलांनी सदर महिलेला न्हावरे येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या हॉस्पिटलमधील डॉ. रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणी करायची आहे असं म्हणून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. सदर महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले.

यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा त्यानंतर पाहू असे म्हटले असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस, असं म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त करत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी महिलेने डॉक्टरांना ढकलून देत घाबरून डॉक्टरांच्या केबिन बाहेर धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली,

झाल्या प्रकारानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशनात धाव घेतली, घटनेबाबत पोलीसांना माहिती देत याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली, पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून भाजपचे आमदार शरद पवार यांना भेटतात, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं खरं कारण

“राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात, त्यामुळे पोपटासारखं तर बोलणारचं ना…”

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या