बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विरोध

पुणे | पुण्यातील पत्रकारितेच्या अभ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला दिसत आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग माध्यम आणि संज्ञापन विभागात स्तलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या स्थलांतराला आता माजी विद्यार्थी आणि पत्रकारांनी जोरदार विरोध केला आहे. त्यानंतर आता पुणे श्रमिक पत्रकार संघाने देखील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थालांतराला विरोध केलाय. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक देखील प्रसिद्ध केलंय.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात बदल करण्यात यावा, अशी विद्यापीठाची इच्छा आहे. अभ्यासक्रमात बदल करण्यात यावा या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु, रानडे इन्स्टिट्यूटमधील एमएच्या वर्गाचं स्थलांतर करू नका, अशी विनंती पुणे श्रमिक पत्रकार संघानं केली आहे. श्रमिक पत्रकार संघ आणि रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारितेचा अभ्यासक्रम यांचा निकटचा संबंध आहे. अनेक पत्रकार रानडेमध्ये शिकून देशापातळीवर पत्रकार म्हणून काम करत आहेत. ज्येष्ठ पत्रकारांनी हा विभाग घडवण्यसाठी खूप कष्ट घेतल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने रानडेमध्ये संयुक्त अभ्यासक्रम चालवला जातो. कमी फी असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी याठिकाणी शिकण्यासाठी येतात. पुण्यातील पत्रकारांनी चालू केलेला हा अभिनव आणि यशस्वी उपक्रम आहे. आगामी काळात हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे. रानडे हे विद्यार्थ्यांसाठी सोयीचं ठिकाण आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे.

रानडे इन्स्टिट्यूटला हेरिटेज इमारतीचा दर्जा आहे. विद्यापीठाप्रमाणे या विभागातही सुधारणा करणं आवश्यक आहे. या गोष्टीचाही विचार करावा. हा विभाग विद्यापीठात स्थरांतरीत करावा, अशी मागणी विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांनी केलेली नाही. तरीही काही घटक विविध उद्देशाने या विभागाचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला पुणे श्रमिक पत्रकार संघाच तीव्र विरोध असेल, असा इशारा देखील पत्रकार संघाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांवर संजय राठोडांनी मौन सोडलं, म्हणाले…

‘एक माली दो फूल’, प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत बघताच प्रेयसीची सटकली अन्….,

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’; आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More