कोर्टाच्या पायऱ्या न चढता स्काईपवरुन मांडली बाजू, घटस्फोट मान्य

पुणे | घटस्फोटाच्या एका प्रकरणात पत्नीने चक्क स्काईपवरुन न्यायालयात आपली बाजू मांडली, विशेष म्हणजे ही बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने घटस्फोटही मंजूर केला. पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हा प्रकार घडला.

अमरावतीत प्रेमविवाह केलेल्या या दाम्पत्यामध्ये वारंवार भांडणं होत होती. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पती सिंगापूरहून सुनावणीवेळी हजर झाला, मात्र पत्नीला लंडनवरुन येता आले नाही. त्यामुळे पत्नीची सुनावणी स्काईपवरुन घेण्यात आली आणि घटस्फोटही मंजूर करण्यात आला.