“अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली”; नव्या आरोपांनी खळबळ

Sunil Tingre

Pune | राज्यात निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी राजकारणातील नेते, मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बापू पठारे यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे (08 नोव्हेंबर) रोजी पुण्यात (Pune) आल्या होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

नक्की काय घडलं?

कल्याणीनगर पोर्शे कार प्रकरणी सुनिल टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण आता विरोधकांनी उचलून धरलं आहे. वडगाव शेरीचे (Pune) बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाषणात बोलत असताना सुनिल टिंगरे यांच्यावर निशाणा साधला. वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी, तुम्ही जर पोर्शेकार आपघातामध्ये माझी बदनामी केली, तर तुम्हाला कोर्टात खेचू, अशी धमकी दिल्याचं सुप्रिया सुळेंनी सभेत सांगितलं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भाषणावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही नोटीस मी स्वतः पाहिलेली नाही. मंचावरील एका व्यक्तीने ही नोटीस वाचली आहे. सुनील टिंगरे (sunil tingre) यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही पोर्श केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू. आता ही नोटीस मी बघणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, पोर्श चालकाकडून हत्या झाली असेल आणि त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही बोलणार. त्या घटनेच्या वेळी स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते. ते का गेले होते? या प्रकरणावर पवार साहेब जर खरे बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवली जाते. परंतु आम्ही तयार आहोत. कारण नेहमी सत्यमेव जयते होते.

News Title – Pune sunil tingre send notice to sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या-

सांगली हादरली! भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या

नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!

नागरिकांना पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…

‘चाटूगिरी करणारे..’, ED चा उल्लेख करत राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

संजय राऊतांनी केला सर्वात मोठा खळबळजनक आरोप!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .