Pune Swargate Case | पुण्यातील स्वारगेट (Swargate) बस स्थानकात ‘शिवशाही’ बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणाच्या तपासात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेनंतर 75 तासांनी आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरू असून, दुसरीकडे पीडितेचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. आपल्या जबाबात पीडितेने आरोपीने लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
75 तासांच्या शोध मोहिमेनंतर अटक-
स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये पहाटे साडेपाचच्या (pune swargate case) सुमारास आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही असतानाही आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि 75 (pune swargate case) तासांनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट येथे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचा मोबाइल तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या गुन्ह्यांचे अधिक धागेदोरे शोधले जात आहेत.
जीवे मारू नको अशी पीडितेची विनंती-
पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, तिच्यावर दोनदा अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून, यात आरोपीने गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे तिने स्पष्ट केले आहे. “मी आरोपीला (दत्ता गाडेला) विनंती केली होती, ‘दादा, मला जीवे मारू नको’,” असे पीडितेने जबाबात नमूद केले आहे.