Pune Swargate Crime | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर (Pune Swargate Crime) उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. वर्दळीच्या बस स्थानकावर हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन (Police Station) असतानाही, मंगळवारी पहाटे ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजकीय आणि सामाजिक पडसाद
अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे आणि महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, फलटणसह (Phaltan) पुण्यात संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. आरोपीवर दरोडा, लूटमार आणि फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला तुरुंगवासही झाला होता. आता अत्याचाराच्या घटनेमुळे त्याच्या गुन्ह्यांमध्ये आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.
आरोपीची वाईट नजर आणि विकृती
आरोपीचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. तरीही, त्याची इतर तरुणी आणि महिलांवर वाईट नजर होती. याच विकृतीतून त्याने स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. तो घरी फारसा राहत नव्हता.
ओला-उबर (Ola-Uber) कॅब चालवून तो पैसे कमवायचा आणि एसटी स्टँडवर (ST Stand) मुक्काम करायचा. मंगळवारी पहाटे एकट्या तरुणीला पाहून आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. (Pune Swargate Crime)
Title : Pune Swargate Crime Accused Criminal History