स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरण: आरोपीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर

Pune Swargate Crime Woman Assaulted 

Pune Swargate Crime | पुण्यातील (Pune) स्वारगेट बसस्थानकात (Pune Swargate Crime) पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. फलटणकडे (Phaltan) जाणाऱ्या एसटी बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.

आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर-

स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे ५.३० वाजता ही अमानुष घटना घडली. पीडित तरुणी काल पहाटे पुण्यावरून फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपीने तिला दिशाभूल करत डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

घटना कुणालाही कशी कळली नाही?

या हृदयद्रावक घटनेनंतर पुणे शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्वारगेट हे शहरातील एक प्रमुख आणि सुरक्षित मानले जाणारे बसस्थानक असूनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसस्थानकावर सतत वर्दळ असतानाही ही घटना कुणालाही कशी कळली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पीडित तरुणी घरी परतल्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असून आरोपी अद्याप फरार आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा असून शिक्रापूर (Shikrapur) आणि शिरूर (Shirur, Pune) पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आधीच गुन्हे दाखल आहेत. (Pune Swargate Crime)

या घटनेमुळे एसटी बसस्थानकांतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून महिला प्रवाशांची सुरक्षितता कितपत आहे, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची पथके वेगाने काम करत असून लवकरच तो गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Title : Pune Swargate Crime Woman Assaulted 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .